सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


Wednesday, 18 December 2019

बालसभा :-चला घडवू स्वतःला


                     बालसभा चला घडवू स्वतःला
सभाधीटपणा , विषय मांडणी , प्रसंगावधानता , विचार प्रवणशीलता अंगी बाणणे , समोरच्याला ऐकून घेणे , स्वतःची मते मांडायला शिकणे तसेच इतर गुणांच्या विकासासाठी शाळेत दररोज दुपारी जेवणानंतर बालसभेचे आयोजन केले जाते .या बालसभेची वैशिष्ट्ये म्हणजे यात सर्व बाबी मुलं करतात जसे की सभेचे सुत्रसंचालन , सभेचा अध्यक्ष ठरवणे , आभार प्रदर्शन करणे व विषयाची निश्चिती करताना शिक्षकांशी चर्चा करतात कोणता विषय दुसऱ्या दिवशी ठरवायचा याविषयी सर्वानुमते ठरते.शेवटी अध्यक्ष सभेचा आढावा घेऊन मुलांच्या भाषणावर स्वतःची मते सांगतात व नंतर सरतेशेवटी एक विद्यार्थी सर्वांचे आभार मानून सभेची सांगता करतो ...

No comments:

Post a Comment