सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


बोलती पुस्तके

बोलती पुस्तके

Marathi Audio books : बोलती पुस्तके

Marathi Audio Books in MP3 format.

ओळख

--------------------------------------------------------------------------------

नमस्कार मंडळी!

मराठी बोलत्या पुस्तकांच्या जगात आपले हार्दिक स्वागत!

आजच्या धकाधकीच्या जगात आपल्यासारख्या "खाऊन-पिऊन सुखी" माणसाला सर्वात जास्त चणचण जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे फावला वेळ. वेळेअभावी आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींना मुकतो ज्यांची मजा एकेकाळी आपण खूप लुटली. अनेकांसाठी यातली एक गोष्ट असते पुस्तकवाचन. रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ नसतो तर पुस्तक कसं वाचणार?

पण ज्या नव्या युगाने हा प्रश्न निर्माण केला त्यानंच त्याचं उत्तरही दिलं, ते आहे अर्थातच "बोलती पुस्तकं"!

इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकांच्या बोलत्या आवृत्त्या उपलब्ध असतात, पण मराठी भाषेत हा विचार त्यामानाने नवीन आहे (वपु, पुलं यांची कथाकथनं वगळता). यासाठीच आम्ही हा बोलत्या पुस्तकांचा खटाटोप आरंभला आहे. आजकाल MP3 Players सगळीकडे उपलब्ध असतात, मग त्यांचा असाही वापर करायला काय हरकत आहे. आणि आमची सर्व बोलती पुस्तकं ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत, अगदी चकट-फू! तुम्ही ती इथे ऐकू शकता किंवा "डाऊनलोड" करून तुमच्या mp3 player वर. (डावीकडे पुस्तकांच्या नावावर ’क्लिक’ करा).

आता तुम्हाला पुस्तकाची मजा लुटायला एका जागी बसायची गरज नाही. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, स्वैपाक करताना, किंवा रात्री झोपी जाताना तुम्ही ही पुस्तकं ऐकू शकता. (आठवतं, लहानपणी आजीच्या गोष्टी ऐकत झोपी जायला काय मजा यायची!)

इथे (डावीकडील पुस्तक-सूची पहा) तुम्हाला काही जुनी (पहा: जुनी पु्स्तकेच का?) पण अत्यंत वाचनीय आणि मौल्यवान मराठी पुस्तके ऐकता येतील. हा उपक्रम नवा आणि सध्यातरी मोजक्याच व्यक्तींनी चालवलेला असल्याने पुस्तकांची संख्या लहान आणि वाढीचा दरही कमी आहे. पण आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांच्या मदतीने (पहा: बोलतं पुस्तक तुमच्या आवाजात!) या दोन्हीत सुधारणा होईल अशी माझी आशा आहे.

आपल्याला हा खटाटोप आवडला, त्याला हातभार लावावासा वाटला किंवा आपले काही अभिप्राय, सुचना असतील तर कृपया मला boltipustake@gmail.com इथे ईमेल लिहुन संपर्क साधा. आपल्यासारख्यांच्या प्रोत्साहनावरच हा प्रपंच सर्वस्वी अवलंबून आहे.

कृपया facebook वर आम्हाला "like" करायला विसरू नका!

धन्यवाद,

आनंद वर्तक

2 comments:

  1. पुस्तकांचे कलेक्शन छान आहे सर

    ReplyDelete
  2. पुस्तकांचे कलेक्शन छान आहे सर

    ReplyDelete