सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


Wednesday, 11 November 2015

आदर्श शाळा देमनवाडी : काही राहून गेलेल्या शुभेच्छा

आदर्श शाळा देमनवाडी : काही राहून गेलेल्या शुभेच्छा

काही राहून गेलेल्या शुभेच्छा

काही राहून गेलेल्या दिपावली शुभेच्छा.....

बाहेर दिवाळीची धामधून सुरु असताना वेटिंग रुममध्ये बसुन, ICU मधे अॅडमिट असलेल्या नातेवाईकाच्या टेन्शनमधे जे कोणी बसलेत त्यांनी त्या टेन्शनमधनं लवकर मुक्त होऊन त्यांनाही दिवाळी साजरी करता येऊदे. तुमचा आजारी नातेवाईक लवकरच रोगमुक्त व्हावा आणि घरी सुखरूप परत यावा ही शुभेच्छा....

फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बाळगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करु शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत ही शुभेच्छा...

शेजारणीचा भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करुन आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं ही शुभेच्छा....

काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करुन सुखावणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जीभेला मिळावं ही शुभेच्छा....

बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा ही अनेकांची अनेक वर्षांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण व्हावी ही शुभेच्छा...

गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्यांना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा ही शुभेच्छा....

...या आणि अशा असंख्य मनःपूर्वक शुभेच्छा


एक दिवा सर्व जगाचा पोशिंदा अन्नदाता महापिता बळीराजाचा ✨

एक दिवा महावीर तीर्थंकरांच्या अहिंसेचा ✨

एक दिवा विज्ञानवादी विचार देणार्या तथागत बुद्धाच्या समतेचा आणि प्रभावी प्रचार प्रसाराचा ✨

एक दिवा भागवताची पताका खांद्यावर घेऊन पंजाबच्या गुरुग्रंथ साहिब मधे स्थानस्त झालेल्या संत नामदेवाच्या बलिदानाचा ✨

एक दिवा विद्रोही संत तुकाराम यांच्या विज्ञानवादी महान कार्य  आणि त्यागाचा ✨

एक दिवा शहाजीराजे यांच्या स्वराज्य संकल्पनेचा ✨

एक दिवा जीजाऊ मासाहेबांच्या संस्कार आणि निर्धाराचा ✨

एक दिवा स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वितेचा ✨

एक दिवा स्वराज्य रक्षक महाबलिदानी छञपती संभाजीराजे यांच्या असामान्य पराक्रम आणि विद्वता आणि आतुलनिय धैर्याचा ✨

एक दिवा प्रजावत्सल राज्यकार्ति राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या दूरदृष्टि समतेच्या सुशासनाचा ✨

एक दिवा स्वराज्याचे आद्य क्रांतिसुर्य महाराजा यशवंतराव होळकरांच्या पराक्रमाचा ✨

एक दिवा आरक्षणाचे जनक पुरोगामी राजा राजर्षी शाहू महाराजांचा ✨

एक दिवा ज्ञानाची कवाडे ऊघडणा-या क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा ✨

एक दिवा ज्ञानदानाची माई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कष्टाचा आणि त्यागाचा ✨

एक दिवा क्रांतिज्योति सह मुस्लिमांमधे शिक्षण नेलेल्या फातिमा शेख यांच्या अतुलनीय योगदानाचा ✨

एक दिवा माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देणारा महामानव डॉ भिमराव आंबेडकरांचा ✨

एक दिवा शोषितांसाठी कामगारांसाठी आयुष्य वेचलेल्या साहित्य रत्न अण्णा भाऊ साठेंचा ✨

एक दिवा अठरा पगड जातीतील बहुजन आणि मावळ्यांच्या शौर्य आणि बलिदानाचा ✨

एक दिवा गाडगे महाराज तुकडोजी गोरा कुंभार सावता माळी जनाबाई सखुबाई या सम सर्व संत मांदीयाळीतील प्रत्येक पुष्पाचा ✨

एक दिवा करकरे, पानसरे, दाभोळकर कल्बुरगी यांच्या बलिदानाचा ✨

एक दिवा आजवर साढ़ेचार लाख आत्महत्या केलेल्या जगाचा पोशिंदा झालेल्या बळीराज्याच्या
वारसांचा ✨

एक दिवा आपल्या संविधानातील मूल्ये - समतेचा, सहिष्णुतेचा ,विश्वधर्मी विचारांचा ✨



🙏🏼  राऊत परिवार कर्जत अ नगर 🙏🏼

Monday, 9 November 2015

दीपावली शुभेच्छा

इडा पिडा टाळुया, बळीचे राज्य आणुया! सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा! दिवाळी हा उजेडाचा, आनंदाचा क्षण! आणि तो बळीराजाची आठवण काढण्याचाही दिवस! बळीराजा; कृषी संस्कृतीचा नायक, प्रजेची काळजी घेणारा, न्यायी, प्रजेला समभागी पध्दतीने उत्पन्न वाटुन देणारा समतावादी राजा.यज्ञयागावर आधारलेले कर्मकांड आणि शोषणव्यवस्थेस त्याने नकार दिला.... म्हणुन विषमतेचा पुरस्कर्ता असलेल्या, वैदिकांचा प्रतिनिधी वामनाने त्याला युध्दात लबाडीने आणि कपटाने दक्षिणेकडे पिटाळले......... "बटु वामनाने तीन पावलांचे दान बळीराजाकडे मागुन त्याला पाताळी धाडले" या पौराणिक कथेचा हा खरा अर्थ. पुढचा सगळा इतिहास जेत्यांनी म्हणजेच वैदिकांनी लिहीलेला असल्याने व मध्ययुगात आम्हाला शिक्षणापासुन वंचित ठेवल्याने तसेच पुरोहितांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या निरर्थक कर्मकांडात आम्ही मानसिक गुलाम बनल्याने आम्ही आमच्याच नायकांना विसरलो..... चला उजेडाचे स्वागत करुया! बुध्द ते तुकाराम; विवेकाची एक सकस, निर्मीतीप्रधान आणि समृध्द परंपरा समजुन घेऊया. दिवाळी साजरी करुया! ....wish you all Happy Diwali

Saturday, 19 September 2015

http://ravindraraut158.blogspot.in/p/blog-page_82.html?m=0

Thursday, 17 September 2015

आपली भविष्य निर्वाह निधीची खाते स्लिप मिळवा .

जि.प.अहमदनगर भविष्य निर्वाह निधी आपली खाते स्लिप मिळवा फ़क्त एका क्लिकवर ..



http://eazegpf.in/

सरल माहिती आता झाली सुलभ

 सरल माहिती आता झाली सोपी . आता आपण मोबाईल वर सरलचे ऍप डाऊनलोड करून घेऊ शकता व मोबाईल वरूनच  सरल भरा ... फ़क्त एका क्लिकवर ..




https://edustaff.maharashtra.gov.in/

आदर्श शिक्षक पुरस्कार निकष माहिती

   आदर्श शिक्षक पुरस्कार निकष माहितीसाठी पुढे फ़क्त क्लिक करा 


 https://drive.google.com/file/d/0B0W3lz2xZNshRmRMY1dGQUswMVE/view

शिष्यवृत्ती निकाल व इतर सविस्तर माहिती


 
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पहा सोबत इतर माहिती ही पहा .  खाली एका क्लिकवर सविस्तर पहा ..
http://msshss.in/HSSMSS/FinalResult.aspx

http://www.mscepune.in/index_M.aspx

Friday, 11 September 2015

आदर्श शाळा देमनवाडी : तंत्रस्नेही कार्यशाळा जिल्हा अहमदनगर

आदर्श शाळा देमनवाडी : तंत्रस्नेही कार्यशाळा जिल्हा अहमदनगर

तंत्रस्नेही कार्यशाळा जिल्हा अहमदनगर

       तंत्रस्नेही कार्यशाळा अहमदनगर 
मा. नंदकुमार साहेब, प्रधान सचिव यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या तंत्रस्नेही शिक्षक चळवळी अंतर्गत जिल्हा परिषद अहमदनगर यांचे मार्फत  दि. ९ व १० सप्टेंबर हे दोन दिवस कोकमठाण या ठिकाणी तंत्रस्नेही शिक्षकांची जिल्हा स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळा श्री. सुरेश भारती उपशिक्षक, जि.प.प्रा.शाळा, येळूशिवाडी, ता. संगमनेर यांनी  बनविलेल्या आराखड्यानुसार विद्या परिषद (SCERT), पुणे मार्फत पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन स. ९ वाजता जि.प.अहमदनगर चे सीईओ मा. शैलेशजी नवाल साहेब,  शिक्षणाधिकारी प्राथ. मा. कडूस साहेब, SCERT चे प्रशिक्षक मा. वाडकर साहेब, डाएट ठाणे येथील मा. चौधरी साहेब, डाएट संगमनेरचे डॉ. करवंदे, डॉ. वाळले व डॉ. श्रीम.अंजली रसाळ ह्या मान्यवरांच्या  शुभहस्ते दिप प्रज्वलनाने झाले.  सदर कार्यक्रमाची सुरुवात आत्मा मालिक ट्रस्ट च्या विद्यार्थ्यांच्या सुमधुर आवाजातील स्वागतगीत, ईशस्तवनाने झाली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आत्मा मालिक ट्रस्ट च्या शिक्षकांनी केले. मान्यवरांनी तंत्रस्नेही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
       सदर प्रशिक्षण Training On Demand या पद्धतीने आयोजित करताना स्वतः नाव नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींनाच देण्यात आले. यासाठी सर्व प्रशिक्षणार्थीं स्वत: चे Laptop, Smart Phone, Net setters, Hard Disk, Pen Drive यासह उपस्थित होते. त्यासाठी लाईट आणि सातत्यपूर्ण Internet wi-fi  Connectivity आत्मा मालिक ट्रस्टच्या वतीने श्री. गायकवाड सर (मुख्याध्यापक. आत्मा मालिक ट्रस्ट प्राथ. शाळा)  यांनी उपलब्ध करून दिले होते. सदर कार्यशाळेसाठी SCERT चे प्रशिक्षक मा. वाडकर साहेब, डाएट ठाणे येथील मा. चौधरी साहेब हे निरीक्षक म्हणून पूर्णवेळ उपस्थित होते.
प्रशिक्षणासाठी पूर्णवेळ उपस्थिती :
शिक्षणाधिकारी - १
उप शिक्षणाधिकारी - १
गटशिक्षणाधिकारी - १४
विस्तार अधिकारी - ९
प्रत्येक बीट मधील एक शिक्षक = ६६
पंचायत समिती क्लार्क - १४
न.पा. / मनपा प्रशासन अधिकारी ५
न.पा. क्लार्क - ५
जिल्हा कार्यालय विस्तार अधिकारी - ३
जिल्हा कार्यालय क्लार्क - १
DIET - ३
एकूण उपस्थिती = १२२

              अहवाल पहा 
[10/09 1:16 PM] Narsale Vijay Tec Savvy Teach: दिवस पहिला : ९ सप्टेंबर २०१५
      सत्र १  
स. १० ते १०.३० तंत्रस्नेही शिक्षक श्री. लक्ष्मण नरसाळे
तंत्रस्नेही शिक्षक श्री. लक्ष्मण नरसाळे यांनी तंत्रस्नेही शिक्षक चळवळीबाबत माहिती दिली. तसेच पहिल्या दिवसाचे नियोजन सांगितले. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थींना कार्यप्रेरणा (Motivation) घेतली पाहिजे याविषयी माहिती दिली.
स.१०.३० ते १.०० तंत्रस्नेही शिक्षक श्री. गोरक्ष पावडे ( Smart Phone) 
तंत्रस्नेही शिक्षक श्री. गोरक्ष पावडे यांनी स्मार्ट फोन चा प्रभावी शैक्षणिक वापर कसा करावा याविषयी प्रात्यक्षिक करून घेतले. यामध्ये WhatsApp, Mobile mail, Data storage , Internate , AppShare यांचे सखोल असे प्रात्यक्षिक करून घेतले.
सत्र २  
दु. २.०० ते ५.३० तंत्रस्नेही शिक्षक श्री. सुरेश भारती ( Video Editing)
श्री. सुरेश भारती यांनी व्हिडीओ एडिटिंग चे प्रात्यक्षिक करून घेतले. यामध्ये Screen Capture, VDO- add cut transaction, Audio add cut transaction, Adding and transaction of Text, Use of various softwares to Compress VDO या सर्व कृती प्रशिक्षणार्थींकडून करवून घेतल्या. कार्यशाळेत सहभागी सर्वांनी स्वतः VDO तयार केले.
सायं. ६ ते ७ आत्मा मालिक इन्टरनॅशनल स्कूल भेट
आत्मा मालिक इन्टरनॅशनल स्कूल येथे डिजिटल क्लासरूम पाहिल्या. तेथील शिक्षकांनी इंटरएक्टिव बोर्ड कसा वापरावा व त्याचा गुणवत्तेत कसा उपयोग होतो हे प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. शिक्षकांनी स्वतः इंटरएक्टिव बोर्ड हाताळून पहिला.
सत्र ३ 
रात्री ९.०० ते ११.३० ( समस्या निराकरण आणि Data Sharing )
Training On Demand  कार्यक्रमाची खरी फलश्रुती या ठिकाणी पाहण्यास मिळाली. अति उत्साहित असलेल्या सुमारे २५ शिक्षकांनी डिमांड केल्याने आजच्या सत्रातील त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रात्री ९.०० ते ११.३० या वेळेत स्पेशल सत्र घेण्यात आले. यावेळी श्री. भारती सर व गोरक्ष पावडे यांनी सर्वांच्या समस्या सोडविल्या. तसेच दरम्यानच्या काळात श्री. रमजान शेख, मिलिंद जामदार, लक्ष्मण नरसाळे यांनी ई-लर्निंग साठी कलेक्शन केलेला Data सर्व शिक्षकांना Laptop व External Hard disk वर copy करून दिला.
[10/09 1:16 PM] Narsale Vijay Tec Savvy Teach: दिवस दुसरा : १० सप्टेंबर २०१५
      सत्र १
स. ८.३० ते ९.०० तंत्रस्नेही शिक्षक श्री. लक्ष्मण नरसाळे
तंत्रस्नेही शिक्षक श्री. लक्ष्मण नरसाळे यांनी पहिल्या दिवसाचा आढावा घेतला. तसेच  Motivational Speech दिले . यातून प्रशिक्षणार्थींना कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.
स. ९.०० ते ९.३० मा. शैलेश नवाल, CEO जि.प. अहमदनगर यांचे मार्गदर्शन
मा. शैलेश नवाल यांनी तंत्रस्नेही चळवळीचा आढावा घेतला. ई-लर्निंग, डिजिटल स्कूल व गुणवत्ता पूर्ण शिक्षण याविषयी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील १०० % शाळांमध्ये येत्या १ वर्षात e-learning कसे सुरु करता येईल यासाठी तंत्रस्नेही गटाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका मांडली.
स. ९.३० ते १०.३० तंत्रस्नेही शिक्षक श्री. रमजान शेख ( e-learning)
तंत्रस्नेही शिक्षक श्री. रमजान शेख  e-learning व Digital School या बाबतच्या संकल्पना, त्यासाठी आवश्यक Equipments- TV, Tab, Projector, Mobile, Interactive Board तसेच या वस्तूंच्या जोडणीसाठी आवश्यक साहित्य यांची माहिती दिली. e-learning चा प्रत्यक्ष output काय असू शकतो हे त्यांच्या स्वतः च्या सुभाषवाडी ता. नगर या शाळेतील विद्यार्थ्यांच्या VDO क्लीप द्वारे दाखवून दिले.
स. १०.३० ते ११.३० तंत्रस्नेही शिक्षक श्री. सुरेश भारती ( Blog Creation )
तंत्रस्नेही शिक्षक श्री. सुरेश भारती यांनी Blog बनण्यासाठी प्रात्यक्षिक कार्यशाळा घेतली. यामध्ये How to create blog, Uploading Photo, Text, VDO, Index या बाबतचे मार्गदर्शन केले. त्यांनी ब्लॉग बनविण्यासंबंधीचे स्वतः तयार केलेले VDO माहितीसाठी सर्व प्रशिक्षणार्थींना दिले.
ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या शाळामधील गुणवत्तापूर्ण उपक्रम आपण इतरांशी कसे share करू शकतो आणि गुणवत्ता वाढीसाठी सर्वांना पोषक वातावरण कसे निर्माण करू शकतो याबबत मार्गदर्शन केले.
स. ११.३० ते १२.३० तंत्रस्नेही शिक्षक श्री. लक्ष्मण नरसाळे (Gmail, Google Drive, Facebook, Facebook page)
तंत्रस्नेही शिक्षक श्री. लक्ष्मण नरसाळे यांनी Gmail, Facebook, Facebook page हे Accounts कसे तयार करायचे, त्याचा आपल्या शालेय कामकाजात होणारा उपयोग या विषयी प्रात्यक्षिक कृती करून घेतली. Data Online Store करण्यासाठी तसेच शालेय कामकाज Paperless करण्यासाठी  Google Drive चा कसा परिणामकारक उपयोग करता येईल हे प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले.
[10/09 1:17 PM] Narsale Vijay Tec Savvy Teach: स. १२.३० ते १.०० तंत्रस्नेही शिक्षक श्री. गोरक्ष पावडे ( Google Input)
तंत्रस्नेही शिक्षक श्री. गोरक्ष पावडे यांनी Unicode Font वापराबाबतच्या शासन निर्णयाचा आधार घेत Google Marathi Input – online कसे install करायचे याविषयी प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. Google Form भरण्यासाठी unicode कसा आवश्यक आहे, हे सोदाहरण स्पष्ट केले.
सत्र २  
दु. २.०० ते ३.३० श्री. संतोष तळघट्टी ( e-learning & Digital school) 
दुपारच्या सत्रात पुण्याहून आलेले पाहुणे श्री. संतोष तळघट्टी यांनी ई-लर्निंग व डिजिटल स्कूल म्हणजे नेमके काय ? गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये तंत्रज्ञान वापर कशाप्रकारे करायला हवा, विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची आवड कशी निर्माण करायची, Digital Classroom कशी असावी  याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. आणि या कामात कार्यरत असलेल्या संस्थांची माहिती दिली.
स. ३०.३० ते ५.०० तंत्रस्नेही शिक्षक श्री. मिलिंद जामदार ( Google Form)
तंत्रस्नेही कार्यशाळेतील महत्वाचा भाग म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन शालेय कामकाजात करताना paperless कामावर भर देऊन वेळेची बचत करणे. यासाठी  Google Form कसा तयार करायचा, त्याचा उपयोग कसा होतो, याद्वारे आपण माहिती संकलानामध्ये कशाप्रकारे वेळेची बचत करून सुटसुटीतपणा आणू शकतो हे online प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. 
      समारोप प्रसंगी सुरेश भारती यांनी सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

            अशाप्रकारे हि तंत्रस्नेही कार्यशाळा अत्यंत यशस्वीपणे पार पडली.

Sunday, 6 September 2015

पहा मा.पंतप्रधानांचे भाषणातील मुख्य मुद्दे



मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामधिल मुख्य मुद्दे 
1 ) मुलांच्या यशामागे आईचा मोठा वाटा 
2 ) प्रत्येक यशस्वी व्यक्ती मागे चांगला शिक्षक 
3 ) शिक्षक त्यागाची भावना रूजवतात 
4 ) विद्यार्थयाकडून आपल्याला खूप शिकता येत 
5 ) विद्यार्थयाच व्यक्तीमत्व घडविण्यामागे शिक्षकांचे योगदान असते 
6)खरा शिक्षक कधिच निवृत्त होवू शकत नाही 
7 ) लहान मुलांच निरीक्षण अचुक असत 
8 ) आई आणि गुरूच स्थान सर्वात श्रेष्ठ असते 
9 ) गुरूचा सल्ला आपण कधिच विसरू शकत नाही 
10 ) गुरू विद्यार्थयाना जगण्याची कला शिकवतो 
11) घटनांच वर्णन लहान मुल छान करतात 
12) वीज वाचवूनही देशाची सेवा होते 
13 ) आई जन्म देते, गुरू जीवन देतात 
14 ) स्वप्न बघणे अतिशय महत्त्वाचे 
15 )कलाम शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थयांसोबत होते 
16 )तुम्ही कलामांना बघु शकलात हे तुमचे भाग्य 
17) प्रत्येकात कविता करण्याची क्षमता असते 
18 ) लहान मुलांचे स्वप्न मरता कामा नये, माझा साधेपणावर विश्वास आहे

Saturday, 5 September 2015

सकट दाम्पत्यास सलाम

🔰शिक्षक दिन विशेष🔰
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️
🈴सौजन्य-ॲडमीन पँनल महाराष्ट्र
👬👬👬👬👬👬👬

🌷संकलन-सोमवंशी तानाजी 9011104464🌷

🎯आजच राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सकट दाम्पत्यांची कर्डेलवाडी शाळा
💐🌺🍂🍃🍁🌹🌷🌸

🔰⚠️🔰🎉🎋📱🔆🔅
कर्डेलवाडीत (जि. पुणे, ता. शिरूर) जिल्हा परिषदेची शाळा चालवणारे मुख्याध्यापक द. रा. सकट आणि त्यांची शिक्षिका-पत्नी बेबीनंदा. एकही सुटी न घेता वर्षातले ३६५ दिवस ही शाळा चालते. ‘ इथले विद्यार्थी केवळ ‘विद्यार्थी ’ राहू नयेत, तर ‘ज्ञानार्थी’ बनावेत,’ हा वसा सकट दांपत्यानं घेतला आहे.

गावातून शाळेकडं म्हणजे डाव्या बाजूनं जायच्या वाटेवर ठिकठिकाणी फलक होते. काही ठिकाणच्या भिंतीही रंगल्या होत्या. गावाचं आणि शाळेचं कर्तृत्व सांगणारी चिन्हं या फलकांवर दिसत होती. गावाला जे जे पुरस्कार मिळाले, ते ते भिंतीवर अवतरले होते. प्रत्येक पुरस्कारात शाळेचा खारीचा किंवा भारीचा वाटा होताच होता. दोन गल्ल्यांच्या बेचक्‍यात अडकलेला रस्ता पार करत आम्ही अशा एका ठिकाणी पोचलो, की जिथं हजारभर लोकवस्तीचं गाव संपलेलं असावं. झाडात लपलेली एक शाळा दिसत होती आणि शाळेवर बोर्ड झळकत होता ‘जि. प. प्राथमिक शाळा, कर्डेलवाडी...’ शाळेच्या व्हरांड्यात पोरं-पोरी रिंगण करून बसले होते. इंग्रजीचा पाठ वाचत पाठ करत ही बच्चेकंपनी बसली होती. बहुतेक ती पहिलीतली किंवा त्याच्याही खालच्या वर्गातली असावीत. सारी पोरं गणवेशात होती. प्रत्येकाच्या डोक्‍यावर गांधीबाबाची टोपी होती. राजकारण्यांनी ही टोपी बऱ्यापैकी बदनाम करून टाकलीय! त्यातून ‘टोपी घालणं’ हा शब्दप्रयोग जन्माला आलाय. रयत शिक्षण संस्थेनंतर बहुधा या शाळेतच मी अशी टोपी पाहिली. स्वच्छ, टोकदार आणि ३०-३५ रुपयांना मिळणारी ही टोपी.
मुलांच्या रिंगणाजवळ बसून एका पोराला प्रश्‍न विचारला ः ‘‘तुझं नाव काय?’’
तो म्हणाला ः ‘‘माझं खरं नाव सोहम आणि खोटं नाव संभू.’’
मग असाच प्रश्‍न एका मुलीला विचारला.
ती म्हणाली ः ‘‘माझं खरं नाव भक्ती.’’
खोटं नाव सांगताना ती किंचित अडखळली. मग असाच प्रश्‍न अन्य एका पोराला विचारला.
तोपर्यंत ती मुलगी म्हणाली ः ‘‘माझं खोटं नाव सोनू.’’ मग मुलगा म्हणाला, ‘‘माझं खरं नाव मंगेश.’’ त्यानं खोटं नाव नाही सांगितलं.
प्रत्येक विद्यार्थ्याला दोन नावं होती. एक शाळेतलं ते खरं आणि शाळेबाहेरचं दुसरं नाव खोटं... गंमत अशी, की दोन्ही नावं चालत होती.
बोलता बोलता पोरांच्या स्वप्नांना हात घातला. वेंकटेश हा डॉक्‍टर, तर वैभव हा सैनिक होणार आहे. प्राजक्ता ही शेतकरी होणार आहे. डॉक्‍टर-शिक्षक होणारी अनेक पोरं होती आणि शेतकरी होणारीही होती. बहुतेक ‘उत्तम शेती...’, हे वाक्‍य त्यांच्याकडून पाठ करून घेतलेलं असावं.
मी ज्या गोष्टीसाठी इथं आलो होतो तो प्रश्‍न विचारला. ‘शाळा किती दिवस चालते?’ त्याचं उत्तर साहिलनं दिलं. वर्षभर. अगदी रविवारीसुद्धा.
या शाळेत मुख्याध्यापक आहेत द. रा. सकट (९८२२९५६२०६). त्यांच्या पत्नी बेबीनंदा शिक्षिका आहेत. दोनशिक्षकी शाळा आहे; पण विद्यार्थिसंख्या वाढल्यानं नीलोफर समीर तांबोळी ही आणखी एक शिक्षिका नव्यानं दाखल झाली आहे.

देशभरात आणि देशाबाहेर गाजलेली शाळा मी पाहत होतो. चौथीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती. बाकीचे तीन-चार वर्ग सुरू होते. दोन शिक्षिका अधूनमधून प्रत्येक वर्गावर जायच्या. मुलं काय करतात ते पाहायच्या. एका वर्गात मुलांची सतत नजर पडेल एवढ्या अंतरावर समानार्थी शब्दांचे फलक टांगलेले होते. भिंतीवर वेगवेगळे तक्ते होते. शेजारच्या वर्गात काही पोरं जोरजोरात सात रंग इंग्रजीतून पाठ करत होतं. संगणकाच्या लॅबमध्येही एक वर्ग सुरू होता. तिथंही इंग्रजीतूनच अभ्यास सुरू होता. एक विद्यार्थी म्हणायचा ः ‘दात घासण्यासाठी मी वापरतो.........’ दुसरी पोरं म्हणायची ः ‘ब्रश... ’ एक लक्षात आलं, की बाहेर जे चौथीच्या पोरांना येतं, ते इथं पहिलीच्याही पोरांना येतं. मराठी-इंग्रजी फाडफाड बोलतात इथं पोरं... त्यांची अक्षरं भुरळ घालणारी आहेत. मनोज आणि गोकुळ मध्येच काहीतरी प्रयोग करायचे. चार-चार वाक्‍यं बोलायचे आणि ती वाक्‍यं विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचे. पोरं अचूक लिहायची. सुंदर अक्षर, शुद्ध भाषा, प्रमाण मराठी आणि यामागं प्रचंड विश्‍वास... आपण चुकतो अशी भावनाच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसायची नाही....

आज गॅस संपलेला होता म्हणून खिचडी शिजणार नव्हती. सरकार खिचडीचा आग्रह धरतं; पण जळण कुठून आणायचा, याचा विचार करत नाही. बाहेरगावाहून आलेल्या पोरांनी त्यांचा डबा खाल्ला. स्थानिक पोरांनी घरी जाऊन पोटात काहीतरी ढकललं.

शाळेत सर्वत्र शैक्षणिक वातावरण पसरलंय. कुठंही नजर टाका, काहीतरी शिकायलाच मिळतं. शाळेत कायद्यानं राबवायचे प्रकल्प आहेत. त्याच्या सर्व फायली नीटनेटक्‍या होत्या. शालेय रेकॉर्डच्या १०१ फायली सलग वाचता येत होत्या. स्त्रीभ्रूणहत्येविरुद्धची पोस्टर लागलेली होती. संगणक लॅब पूर्ण एसी होती. शाळेत ग्रंथालय होतं; पण त्यातली पुस्तकं जाणीवपूर्वक खरेदी केलेली आणि जीवनाभिमुख होती. कसलाही ताणतणाव नाही. छड्या फिरवणं नाही. चिडचिड नाही. शांतपणे सारं काही चाललेलं. वेगळंच वातावरण, जे शिकण्यासाठी आवश्‍यक असतं, तेच जाणीवपूर्वक जन्माला घातलेलं. अशा वातावरणात मुलांचा बुद्‌ध्यंक वाढत गेला. गळती कमी होत गेली. शिष्यवृत्ती परीक्षेत इथली पोरं राज्यात-जिल्ह्यात चमकू लागली. शिकणं आनंददायी असतं, हे पोरांना कळू लागलं. ४० ते ५० टक्के मतिमंद असलेला पोरगाही नॉर्मल पोरांच्या इतका धावू लागला. जी शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत होती, तिथं प्रवेशासाठी गर्दी होऊ लागली. बाहेरगावाहून मुलं येऊ लागली. एकेकाळी भकास वाटणारी शाळा बघता बघता सुंदर रूप घेऊन उभी राहिली.  मोजता येत नाहीत इतके पुरस्कार या शाळेला मिळाले. ती एक मॉडेल झाली. अनेकांनी भेटी दिल्या. कलेक्‍टर, सीईओ, पदाधिकारी... साऱ्यासाऱ्यांनी भेटी दिल्या. मुख्याध्यापकांनाही पुरस्कार दिले. शाळेला कुणी संगणक दिला, कुणी एसी दिला, कुणी सोलर एनर्जीचा सेट दिला, कुणी पाणी शुद्ध करण्याची व्यवस्था दिली. या शाळेतून बाहेर पडणारी बहुतेक मुलं पुढं विज्ञान आणि अभियांत्रिकीला गेली. तिथंही गळतीचं प्रमाण कमी आहे.
मुख्याध्यापक सकट आपल्या आदर्श शाळेचा प्रयोग घेऊन महाराष्ट्रभर फिरले.


हा संपुर्ण लेख वाचण्यासाठी तसेच इतर वाचनीय लेख तथा सर्व शैक्षणिक माहितीसाठी क्लिक करा.

http://tanajisomwanshi.blogspot.in/p/blog-page_44.html?m=1

🙏साभार- दै.सकाळमधील "फिरस्ती"मधील संपादक उत्तम कांबळे यांचा लेख🙏

Thursday, 3 September 2015

चला तंत्रस्नेही बनुया बंधूंनो

🎯🎯महाराष्ट्र  एडमिन पैनल🎯🎯
              !!निर्मित उपक्रम!!
🌷🌷चला तंत्रस्नेही बनु या 🌷🌷

🎯🎯ऑफ़ लाइन व् ऑन लाइन टेस्ट तयार करण्याची पद्धती:::-
http://www.quizbox.com/builder/

🎯विडिओ निर्मिती पद्धती:::-
https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=SjCrvlkL_2w

🎯🎯ऑफ़ लाइन व् ऑन लाईन अप्लिकेशन तयार करण्याची पद्धती.
http://www.appsgeyser.com/mobile/

🎯🎯ब्लॉगिंग विकास पद्धती
https://www.blogger.com
🎯वेब साईटस तयार करण्याची पद्धती
http://myidealshool.blogspot.in/
🎯🎯माहिती तंत्रचा एक्सपर्ट वापर साठी नव नव  माहिती तंत्र पद्धती
https://developers.google.com/products/
🎯🎯 🌏एका प्राथमिक शिक्षकाचे यश🌏 🎯🎯

‘एबीपी माझा’ने आयोजित केलेल्या ‘ब्लॉग माझा 2015’ स्पर्धेमध्ये  प्रशांत क-हाडे,  (सहाय्यक शिक्षक, जि.प उच्च प्राथ. शाळा शेगांव खु. प.स. भद्रावती जि.प. चंद्रपूर) यांच्या www.shikshanmitra.in या  ब्लॉगची निवड करण्यात आली आहे. ब्लॉग माझा स्पर्धेचं पुरस्कार वितरण यावर्षी एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र’ या कार्यक्रमात होणार आहे.

एबीपी माझाचा ‘माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र’ हा कार्यक्रम मुंबईमध्ये सोमवार, 31 ऑगस्ट 2015 रोजी आयटीसी ग्रँड सेंट्रल, परळ, मुंबई येथे होणार आहे.
🎯🎯 ही पोस्ट वाचून अतिशय आनंद झाला प्रशांत सर जीवन संघर्ष व् समाज सत्यतिल एक आदर्श उदा आहे माझ्या ही सहवातिल व्यक्तिमत्व खुप मन मिळावू स्वभाव आहे सरांचा, सतत कार्य तत्परता आहे

प्रशांत क-हाडे, सर की इट उप पुढील कार्यस आपल्याला ग्रेट सैल्युट ।नमो सत्य जय हिंद।।
🎯🎯 आज दिवसभर राज्यातील अनेक शिक्षक बंधू भगिनीना ग्रुप पोस्ट व् वैयक्तिक मार्गदर्शन करीत होतो कृपया एखादे वैयक्तिक मेसज द्वारे योग्य सहकार्य मिळाले नसेल तर मला माप करा शेवटी मी पण फार हुशार नाही आपल्या सर्वांचे मार्गदर्शन व् सहकार्य तुन आपल्या सतत कार्य तत्पर असणारे आपले मित्र प्रशांत सर कार्य ची पोस्ट फॉरवर्ड करीत सर्व ग्रुपवरुण आपली रजा घेतो तर चला मग आता नुसते whatsapp नको तर त्या पुढे घ्या भरारी हिच पुढ़ील नव  शिक्षण पद्धतीची  तयारी  नमो सत्य जय हिंद।।

आदर्श शाळा देमनवाडी : निसर्गाच्या सानिध्यात चला

आदर्श शाळा देमनवाडी : निसर्गाच्या सानिध्यात चला

Wednesday, 2 September 2015

शफी सर ढाणकी यांना भेटा येथे

👫👭👬👭👬👫👭👬👫👭👬
------------------------------------------------------------
     
           प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम
          __________________________

मित्रांनो
🙏
आपली प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आम्हा शिक्षकावर आहे. या कार्यक्रमाबाबतीत मी शफी सर, ढाणकी, आपल्याला सोयीस्कर व्हावे संपूर्ण फॉर्म्यॅट माझ्या ब्लॉग द्वारे डाऊनलोड साठी लिंकस्वरुपात देत आहे.
_____________________________________
               🔻प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
                     कार्यक्रम शासन निर्णय
                            👇
     प्रगत-शैक्षणिक-महाराष्ट-3/
_____________________________________
                🔻संकल्प शासन निर्णय
                           https://shafisk.wordpress.com/2015/09/01/प्रगत-शैक्षणिक-महाराष्ट-5/
_____________________________________
               🔻महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेमध्ये
                      सुधार घडवून आणण्याकरीता
                      कार्यक्रम
                             👇
https://shafisk.wordpress.com/2015/08/31/महाराष्ट्र-शैक्षणिक-गुणव/
_____________________________________
                🔻शंका समाधान
                           👇
https://shafisk.wordpress.com/2015/09/01/शंका-समाधान/
_____________________________________
                🔻भाषा विषय नमूना प्रश्न
                         👇
https://shafisk.wordpress.com/2015/09/01/भाषा-विषय-नमूना-प्रश्न/
_____________________________________
               🔻भाषा विषय मार्गदर्शक सूचना
                        👇
https://shafisk.wordpress.com/2015/09/01/भाषा-मार्गदर्शक-सूचना-व-च/
_____________________________________
               🔻गणित विषय नमूना प्रश्न
                         👇
https://shafisk.wordpress.com/2015/09/01/गणित-विषय-चाचणी-नमूना-प्र/
_____________________________________
               🔻गणित विषय चाचणी साहित्य
                         👇
https://shafisk.wordpress.com/2015/09/01/गणित-विषय-चाचणी-साहित्य/
_____________________________________
               🔻चाचणी संविधान तक्ता
                       👇
https://shafisk.wordpress.com/2015/09/01/चाचणी-संविधान-तक्ता/
_____________________________________
               🔻भाषा विषय संकलन तक्ता
                        👇
https://shafisk.wordpress.com/2015/09/01/भाषा-विषयसंकलन-तक्ता/

_____________________________________
               🔻गणित विषय संकलन तक्ता
                          👇
https://shafisk.wordpress.com/2015/09/01/संकलन-तक्ता-विषय-गणित/
_____________________________________

     || सर्व मिळून या कार्यक्रमाला संपूर्ण
                यशस्वी बनवू ||
     || प्रगत होईल प्रत्येक विद्यार्थी हा ध्यास
                 मनी ठेवू ||

                     आपला मित्र
        शफी सर, ढाणकी, यवतमाळ
                 75071270712
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👬👭👬👭👬👭👬👭👬👭👬
               झाडे लावा, झाडे जगवा

Monday, 31 August 2015

आदरणीय नंदकुमार साहेब सचिव शालेय शिक्षण व क्रीड़ा यांचे आवाहन पहा

सर्वांना नमस्कार.

आपण सप्टेबर दुसरा आठवड्यात राज्यभर पायाभूत चाचणी घेणार आहोत. मुलांना काय येते, कोठे मदतीची गरज आहे ते शोधण्यासाठी या चाचण्या आहेत. शिक्षकांनी आपापल्या वर्गात त्या घ्यायच्या आहेत.  या चाचणीचा बाऊ होणार नाही, वातावरण आश्वासक असेल, प्रात्यक्षिक-लेखी प्रश्न सोडवताना मुलांना मजा येईल, आणि एखादी न येणारी गोष्ट चाचणी देता-देता मूल सहज शिकेल अशी अपेक्षा आहे.

मुलांची गणिताची समज, कौशल्ये, विचारक्षमता तपासण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न यात आहेत. मुलांना कदाचित या प्रकारच्या प्रश्नांचे अनुभव याआधी मिळाले नसतील. त्यामुळे त्या प्रकारच्या प्रश्नांचा चाचणीपूर्वी जरूर सराव करून घ्यावा. म्हणजे मुलांना त्या गोष्टी चाचणीत करता येतील. या चाचण्या अजिबात गोपनीय नाहीत. चाचणीतील विशिष्ट प्रश्नांची उत्तरे पाठ करून घेऊ नयेत, इतकेच.

संख्यांची समज तपासताना केवळ संख्येचे वाचन लेखन तपासून पुरत नाही. ती संख्या म्हणजे नेमके किती, ते शतक-दशक-एकक प्रतीके वापरून दाखवता आले पाहिजे. तुमच्या शाळेत नेहमी जी प्रतीके वापरली जात असतील, उदा. काड्यांचे गठ्ठे-सुटे, मणी-माळा, दहाच्या व एकच्या नोटा, दांडे-सुटे, ती जास्त संख्येने जमवून ठेवा. जी प्रतीके तुम्हाला सोयीची वाटतील ती वापरा. एक, दहा, शंभर, हजारच्या खोट्या नोटा जमवा अथवा कार्डांवर लिहून मुलांच्या मदतीने तयार करा. प्रतीके वापरून संख्या तयार करणे, जमिनीवर अथवा पाट्यांवर आखलेल्या घरांमध्ये ती मांडणे व त्यानुसार संख्या अंकात लिहिणे याचा पुन्हा सराव घ्या.

या चाचणीत पुढील प्रकारचे प्रात्यक्षिक, मनात विचार करून उत्तर लिहिण्याचे किंवा लेखी प्रश्न असतील.
- ऐकलेली संख्या प्रतीके वापरून दाखवणे, अंकातील संख्या वाचून प्रतीके देणे, प्रतीके पाहून संख्येचे नाव सांगणे.
- आयतातील चौकटी मोजून गुणाकार लिहिणे.
- मोजपट्टीच्या सहाय्याने लांबी मोजणे, टेलरिंग टेपच्या सहाय्याने लांबी, परिमिती मोजणे.
- कोनमापकाच्या सहाय्याने कोन मोजणे व दिलेल्या मापाचा कोन काढणे.
- कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे.
- रंगवलेला भाग अंश छेद रूपात व दशांशात लिहिणे, सांगितलेला अपूर्णांक रंगवणे.

यासारख्या गोष्टींचा चाचणीपूर्वी सराव घ्या.

लेखी चाचणीतील प्रश्नही थोडे निराळ्या प्रकारचे असू शकतील. इयत्ता दुसरी व तिसरीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न वाचत तो प्रश्न समजावून सांगा व मग सोडवायला सांगा. उत्तराचा क्ल्यू न देता प्रश्न समजावा. अगदी आठवीपर्यंतच्या मुलांना गरज असेल तेथे प्रश्न वाचून दाखवा. उत्तरामध्ये मांडणी, रीत, शुद्धलेखन यातले काहीही तपासायचे नाही. फक्त गणिताची समज तपासायची आहे. त्यामुळे उत्तर आले किंवा नाही आले इतकेच पहायचे आहे.

मुलांना वरील प्रकारचे अनुभव देऊन चाचणीपूर्वी जरूर सराव घ्या. पण इतके लक्षात ठेवा की चांगला रिझल्ट दाखवण्यासाठी आपण ही चाचणी घेत नाही. आपण कोठे आहोत ते पाहून पुढील काम आखण्यासाठी घेत आहोत. चाचण्या अंतिम झाल्या की तुमच्याशी त्या येथे शेअर करेनच. रिझल्ट चांगला यावा यासाठी त्यातीलच प्रश्नांची उत्तरे पाठ करून घेऊ नका. चाचणीतील प्रश्न पहा, संख्या बदलून, प्रश्न बदलून त्या प्रकारचे प्रश्न सोडवून घ्या. मुलांची समज वाढू द्या.

नंदकुमार
प्रधान सचिव,
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र राज्य

निसर्गाच्या सानिध्यात चला


इथे नांदती मुलांसोबत खग ,
       हसती ,गाती आनंदे भरती ,
रंग भरती या जीवनी मग ,
      तयांच्या मग भविष्यवाटा फुलती !







पहा फोटोशॉप मधील शॉर्टकट बटणे

🔹फोटोशॉपमधिल शॉर्टकट बटणे 🔹
 
कि-बोर्डवरील सुलभ वापरली जाणारी बटणे

💮F1 - फोटोशॉपची माहिती असणारे विभाग उघडण्यासाठी

💮F5 - ब्रशचा आकार निवडण्यासाठी

💮F6 - रंगाचा आणि रंग-छटांचा विभाग उघडण्यासाठी

💮F7 - Layers, Channels, Paths  चा विभाग उघडण्यासाठी

💮F8 - Navigator, Info  चा विभाग उघडण्यासाठी

💮F9 - Actions, History, Presets चा विभाग उघडण्यासाठी

💮Tab (Key) - सर्व चालू विभाग उघडण्यासाठी तसेच बंद करण्यासाठी

💮Shift + Tab (Key) -  मुख्य टूलबार वगळता इतर सर्व चालू विभाग उघडण्यासाठी तसेच बंद करण्यासाठी
 
 
  🔹कि-बोर्डवरील शॉर्टकट बटणे 🔹
 
💮Ctrl + N - नविन फाईल सुरु करण्यासाठी

💮Ctrl + M - Curves विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + A - चालू फाईलीला सर्व बाजूंनी सिलेक्ट करण्यासाठी

💮Ctrl + D - एखादे अथवा संपूर्ण सिलेक्ट केलेले काढण्यासाठी

💮Ctrl + J - चालू लेअर (Layer) चा डुप्लिकेट  लेअर म्हणजेच तसाच दुसरा लेअर बनविण्यासाठी

💮Ctrl + K - Preferences विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + L - Levels Dialogue Box  उघडण्यासाठी

💮Ctrl + F4 - चालू फाईल बंद करण्यासाठी

💮Ctrl + ' (Single Quote Key) - Grid Lines चालू अथवा बंद करण्यासाठी

💮Ctrl + Q - फोटोशॉप बंद करण्यासाठी

💮Ctrl + R - Rulers (फूटपट्टी) चालू अथवा बंद करण्यासाठी

💮Ctrl + U - Hue/Saturation विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + O - फाइल उघडण्यासाठी

💮Ctrl + P - प्रिंट विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Z - शेवटची गोष्ट अनडू (Undo) करण्यासाठी

💮Ctrl + Tab - एकापेक्षा जास्त फाईलींमध्ये स्थलांतर करण्यासाठी

💮Ctrl + Shift + C - चालू फाईलमधिल अनेक लेअर्स मधिल सर्व गोष्टी एकत्रीत कॉपी करण्यासाठी

💮Ctrl + C - कॉपी करण्यासाठी

💮Ctrl + H - फाईलमधिल इतर गोष्टी बंद करण्यासाठी

💮Ctrl + Shift + ; - Snap (चिकटणे) विभाग चालू अथवा बंद करण्यासाठी

💮Ctrl + X - कट (Cut) करण्यासाठी

💮Ctrl + Alt + Shift + X - Pattern Maker  विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + V - पेस्ट (Paste) करण्यासाठी

💮Ctrl + Shift + V - सिलेक्ट केलेल्या जागेमध्ये पेस्ट करण्यासाठी

💮Ctrl + Alt + Shift + V - सिलेक्ट केलेल्या जागेच्या बाहेर पेस्ट करण्यासाठी

💮Ctrl + T - Transform Tool विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + O - File Browser उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + P - फाईलचा Page Setup विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + S - फाईलचा Save As विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + K - Color Setting Preferences विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + F - Fade Dialogue विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + X - Liquify Filter Tool विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + N - नविन लेअर आणण्यासाठी

💮Ctrl + Shift + M - ImageReady सुरु करण्यासाठी

💮Ctrl + Shift + E - सर्व लेअर्सना एकत्र करुन त्यांचा एकच लेअर बनविण्यासाठी

💮Ctrl + Alt + Z - मागे जाण्यासाठी

💮Ctrl + Shift + - (वजबाकीचे चिन्ह) - Zoom Out (लहान) करण्यासाठी

💮Ctrl + Shift + + (अधिकचे चिन्ह) - Zoom In (मोठे) करण्यासाठी

💮Ctrl + Shift + Alt + N - नविन रिकामे लेअर आणण्यासाठी

💮Ctrl + Shift + Alt + S - Save For The Web विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Alt + ~(Tild Symbol) - चालू लेअरमधिल सफेद अथवा उजळ जागा सिलेक्ट करण्यासाठी

💮Ctrl + Shift + I - सिलेक्ट केलेल्या जागेच्या विरुद्ध जागा सिलेक्ट करण्यासाठी

💮Ctrl + Alt + X - Extract विभाग उघडण्यासाठी

💮Shift + -/+ signs(on a layer) - लेअरचे निरनिराळे विभाग बदलण्यासाठी

💮Shift + Ctrl + Z - पूढे जाण्यासाठी
 
 
🔹फोटोशॉपमधिल टूलबारवरील शॉर्टकट बटणे🔹
 
💮R (Key) - Blur Tool - अंधूक अथवा धुसर टूल

💮E (Key) - Eraser Tool - खोडण्याचा टूल

💮T (Key) - Horizontal Type Tool  - लिहिण्याचा टूल

💮Y (Key) - History Brush Tool - हिस्टरी ब्रश  टूल

💮U (Key) - Line Tool - लाईन  टूल

💮I (Key) - Measure Tool - मेझ्यर  (मोजमाप) टूल

💮O (Key) - Sponge Tool - स्पन्ज  (रंग शोधणारा) टूल

💮P (Key) - Pen Tool - पेन  टूल

💮A (Key) - Direct Select Tool - सरळ सिलेक्ट  टूल

💮W (Key) - Magic Wand Tool - जादूची कांडी  टूल

💮S (Key) - Clone Stamp Tool - क्लोन स्टॅम्प  टूल

💮G (Key) - Gradient Stamp Tool - ग्रेडिअन्ट (रंगछटा) स्टॅम्प  टूल

💮H (Key) - Hand Tool - हॅन्ड (हात) टूल

💮J (Key) - Healing Stamp Tool - हिलिंग स्टॅम्प  टूल

💮K (Key) - Slice Stamp Tool - स्लाईस स्टॅम्प  टूल

💮L (Key) - Polygonal Lasso Tool - पॉलिगॉनल लॅस्सो टूल

💮Z (Key) - Zoom Stamp Tool - झूम (भिंग) स्टॅम्प  टूल

💮C (Key) - Crop Stamp Tool - क्रॉप स्टॅम्प  टूल

💮V (Key) - Move Tool - हलविण्याचा  टूल

💮B (Key) - Brush Tool - ब्रश  टूल

💮N (Key) - Notes Tool - नोंदी लिहिण्याचा टूल

💮M (Key) - Rectangular Marquee Tool - आयताकृती मार्की टूल

Sunday, 30 August 2015

शालेय शिक्षण व क्रीड़ा विभागाने जानेवारी2015 ते ऑगस्ट अखेर काढलेले शासन निर्णय पहा

📝📝📝📝📝
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जानेवारी 2015 ते 20 आॅगस्ट 2015 अखेर काढलेले महत्वाचे शासन निर्णय सांकेतांक व दिनांk

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, महिलांकरिता तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबाबत......
201501151441138321
14-01-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
जिल्हा परिषदांच्या शाळांना मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत
201502111844458221
11-02-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
दहीहंडी या उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याबाबत.
201502131431070621
11-02-2015




शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
सन 2014-2015 घर बांधणी अग्रिम मंजूर करण्याबाबत
201503231836264221
23-03-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
आर्थिक वर्ष 2014-2015 वैयक्तिक संगणक खरेदीसाठी अग्रिम
201503231830209121
23-03-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अनुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने इयत्ता 5 वी व 8 वी चे वर्ग सुरू करणेबाबत
201503251247354221
24-03-2015




शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्यातील इयत्ता 1 ली ते 4 थी तील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य वाटप योजनेच्या निधी वितरणाबाबत
201503312024539521
31-03-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
सेवानिवृत्त होणाऱ्या़ शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन विषयक लाभ वेळेवर अदा करण्याबाबत अशासकीय मान्यता व अनुदान प्राप्त प्राथमिक / माध्यमिक /उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालये यामधील पूर्णवेळ व प्रशिक्षित शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी
201504241210152121
06-04-2015


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड देण्यासाठी अभियान
201504211358081421
21-04-2015


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविणे बाबत.
201505061643332421........
06-05-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्यातील शाळाबाहय बालकांचे एक दिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षण .
201505201054511821
20-05-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
प्राथमिक/ उच्च प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळेच्या आवारात मोबाईलफोन (भ्रमणध्वनी) वापरण्यावरील निर्बंध शिथिल करण्याबाबत.
201506241230528821
28-05-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याबाबत.
201506171721506321
17-06-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शालेय शिक्षण विभागांतर्गत प्रशासकीय सुधारणांसाठी माहिती तंत्रज्ञान गट स्थापन करणेबाबत
201506201506271921
20-06-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सन 2015-16 पासून अंमलबजावणी करणेबाबत
201506241221359221....
22-06-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेसाठी व शिक्षकांच्या सुलभी करणासाठी शैक्षणिक व्हिडिओ व तत्समई-साहित्याच्या निर्मितीबाबत.
201506241449330621
24-06-2015




शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजनेचे नामाभिधान उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना असे करणेबाबत....
201506291539510721
29-06-2015




शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजनेचे नामाभिधान उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना असे करणेबाबत....
201507021205280121
02-07-2015


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शाळा, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांची माहिती सरल (SARAL - Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबत
201507031648548621
03-07-2015




शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
गोविंदा या मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत.
201508131458581621
11-08-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्नेह भोजन उपक्रम राबविण्याबाबत.
201508131135105021
13-08-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन पुढील महिन्याच्या 1 तारखेस अदा होणेबाबत.
201508131707175721
13-08-2015



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक तसेच आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक यांना राज्य शिक्षक पुरस्कार सन 2014-15.
201508211804075221
20-08-2015
✏✏✏✏✏

आदर्श शाळा देमनवाडी : विद्याथी माहिती

आदर्श शाळा देमनवाडी : विद्याथी माहिती

Tuesday, 12 May 2015

माझ्या शाळेने  आयोजित केलेले  केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व क्रीडास्पर्धांचे यशस्वी  झाले .
यावेळी माझ्या वाडीतील तरुणांनी खूपच सहकार्य केले तसेच , ग्रामस्थांनी उपस्थित सर्व विद्यार्थी ,शिक्षक ,अधिकारी , प्रेक्षक यांना  सर्वांनाच  सांबर भात लापशीचे  मिष्टान्नाचा  लाभ हि दिला .