देमनवाडी शाळेतील आमची इयत्ता पहिली तील मुलं आनंददायी शिक्षणाचा आनंद घेताना ..शिक्षणातून प्राणी ,पक्षी ,कीटक ओळखणे त्यांचे वर्गीकरण करणे..यातुन सुक्ष्म निरीक्षण करणे , एकाग्रता वाढीस लागणे , विचार करणे , बैठक वाढणे व या क्षमतांच्या विकसनासोबतच आनंद घेणे ..शिकण्याची प्रक्रिया म्हणजे या अशा छोट्या मोठ्या कृतींतून शिकणं सवरणं होतं..
Showing posts with label प्रासंगिक. Show all posts
Showing posts with label प्रासंगिक. Show all posts
Thursday, 6 July 2023
Tuesday, 20 June 2023
आम्ही संगणक हाताळतो☺️👍
_*आज दिनांक 21/06/2023 रोजी योगदिनानिमित्त विविध आसने ,कृती ,प्राणायाम झाल्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी संगणक स्वतः सुरू करून त्यावर विविध प्रकारच्या गणितीय कृती स्वतः केल्या व आनंद मिळविला.मुलांच्या स्वकृतीचा आनंद मिळविताना पाहताना पाहून मनस्वी समाधान वाटते.लीलया मुलं माऊस हाताळतात , की बोर्डचा उत्तम वापर करतात .वेगवेगळ्या की योग्य त्या वेळी वापरून कृती करतात ..*_
Location: Karjat Ahmednagar India
C2XM+F38, Demanwadi, Maharashtra 414402, India
Tuesday, 3 January 2023
ज्ञानज्योती ,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी येथे ज्ञानज्योति, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात माईंना अभिवादन करण्यात आले . यावेळी सावित्रीच्या लेकींनी त्यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला व आदरभाव व्यक्त केला. याप्रसंगी शाळेतील मुलांनी , मुलींनी माईंच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले .तसेच सौ.मोहिनी प्रमोद देवकाते यांनी क्रांतीज्योतींच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थित सर्वांना दिली व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सौ.नीता भारत देवकाते , अंगणवाडी ताई सौ.चंद्रकला पालवे , सौ.प्रतिभा शेजाळ देवकाते यांनी उपस्थित राहून माईंना अभिवादन करून फुले व पुष्पहार अर्पण केला. शेवटी मुख्याध्यापक श्री रविंद्र राऊत यांनी माईंचे कार्य व आजची गरज याविषयी सांगून खऱ्या अर्थाने जयंती साजरी करायची असेल तर त्यांनी दिलेला वसा व विचार अर्थात शिक्षण सर्वांनी मनापासून घेण्याची गरज सांगितली ...
Friday, 23 December 2022
दप्तरमुक्त शनिवार नि आमुच्या गंमती जंमतीतुन अमुचा अभ्यास
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी येथे आज दिनांक 24/12/2022 रोजी दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत मुक्त हालचाली , योगासने , सूर्यनमस्कार , त्यातच शेवटी शवासन करून रिलॅक्स मध्ये झोपलेल्या स्थितीत चिंतनात पहिली 1 ते 100 , दुसरी 100 ते 1 , 3 री व 4 थी पाढे सराव व नंतर त्याच स्थितीत वर्गानुसार एकेकाचे सादरीकरण एकेका ओळींचे , पाढ्याचे सादरीकरण केले . हा आज वेगळा अनुभव मुलांनी घेतला व त्यात त्यांना खूपच आनंद व वेगळेपण जाणवले ..
Subscribe to:
Posts (Atom)


