Tuesday, 4 March 2025
आभार आदरणीय सभापती महोदय विधान परिषद महाराष्ट्र राज्य मा.ना.रामजी शिंदे साहेबांचे .
खूप खूप दिवसांची मनिषा काल पूर्ण झाली . मागील तब्बल पाच वर्षांपासून दोन्ही आमदार महोदयांकडे लेखी तसेच तोंडी खूप वेळा मागणी केली होती .कारण ही तसेच होते . अहिल्यानगरीच्या सरहद्दीवर वसलेली मेंढपाळाच्या वस्तीवरील लेकरांना उपलब्ध संगणकावर विविध कृती करण्यास शिकविले तेही अगदी पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्वच्या सर्वच लेकरांना .. विशेष आंनद हा होतो की शंभर टक्के सर्व विद्यार्थी शाळेतील संगणक सफाईदारपणे हाताळतात . अगदी एक्सल मध्ये फाईल ही त्यांनी बनवल्या आहेत . असे असताना तालुक्यातील इतर शाळांना इंटरएक्टिव पॅनेल मिळाले होते . इथे प्रतिकूलता असतानाही आमची मुले संगणक सफाईदारपणे हाताळत असताना ती सर्व या अत्याधुनिक पॅनेल पासून वंचित राहिली होती . प्रतिकूलता किती सांगावी ...कौटुंबिक तर सांगणे नकोच ...परंतु शाळेतील भौतिक सुविधांचा वानव खूप ..विजेची तर खूपच अडचण या वर्षभरात या दोन दिवसांत फक्त पूर्ण दिवस वीज उपलब्ध झाली . त्याच्या आधी तर कधीतरी दोन चार दिवसांतून अर्धा पाऊण तास वीज असायची . तर पंधरा पंधरा दिवस नसायची ... असे असतानाही आमची गुणी विद्यार्थी संगणक हाताळत असायची . काल साडे चार वाजता फोन आला की पॅनेल घेऊन येत आहेत थांबा... माझ्यासह लेकरे तरी कशी हालतील .. एकदाचा जबरदस्त फिचर असलेला पॅनेल पोहोचला त्याबद्दल मा.नामदार सभापती महोदय रामजी शिंदे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानायचे ठरवले . व साहेबांना त्यांच्या नंबरवर टेक्स्ट मेसेज करून आभार मानले .आता पुढील काही दिवसांत इन्स्टॉलेशन होऊन त्याच्या वापराचा मनस्वी आनंद आम्ही सर्व घेऊत ... पुनःश्च एकदा मा.सभापती महोदय ना.रामजी शिंदे साहेब आपले खूप खूप आभार ...
Subscribe to:
Posts (Atom)