सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


Friday, 11 April 2025

क्रांतीबा तात्यासाहेब फुलेंना त्यांच्या कार्याला अनुरूप जयंती देमनवाडी शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी


 

_*क्रांतिसुर्य महात्म्यांचे महात्मा असणारे जोतिराव उर्फ तात्यासाहेब फुलेंच्या जयंतीला अनुरूप असे कार्य आळसुंदे ग्रामीचे लोकनियुक्त सरपंच मा.जिजाबापू अनारसे, उपसरपंच मा.डॉ.अनिल गाडे ,  माजी उपसरपंच मा.शिवाजीराजे देशमुख , सदस्य ,भा .ज.प.च्या भ.वि. आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.गणेश पालवे, तालुका उपाध्यक्ष मा.रमेशदादा अनारसे ,मा.उपाध्यक्ष मा.काकासाहेब अनारसे , विधान परिषदेचे सभापती मा.रामजी शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक मा.संभाजीराजे गोसावी ,भा.ज.प.चे युवा नेते अतुलराव अनारसे , कर्जतवरून आलेले युवानेते यशराज बोरा व मान्यवरांनी देमनवाडी शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून क्रांतीबांना अभिवादन केले. अशाच प्रकारे महापुरुषांच्या जयंत्या व स्मृतिदिन साजरे होणे अपेक्षित आहे . महापुरुषांना डोक्यावर घेण्यापेक्षा  व त्यांच्या केवळ तसबीरी पूजण्यापेक्षा  सध्याच्या परिस्थितीत  त्यांना डोक्यात घेण्याची जास्त गरज आहे. त्यादृष्टीने समस्त आळसुंदेकर वाटचाल करीत आहेत सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏 क्रांतिबांना मानाचा मुजरा  🙏 यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  श्री रविंद्र  राऊत यांनी क्रांतिसुर्य महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. शाळेतील सहकारी शिक्षिका श्रीम. विजया रंधवे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. शेवटी विद्यार्थ्यांना  खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचे  समापन करण्यात आले. *_

Tuesday, 4 March 2025

आभार आदरणीय सभापती महोदय विधान परिषद महाराष्ट्र राज्य मा.ना.रामजी शिंदे साहेबांचे .


 खूप खूप दिवसांची मनिषा काल पूर्ण झाली . मागील तब्बल पाच वर्षांपासून दोन्ही आमदार महोदयांकडे लेखी तसेच तोंडी खूप वेळा मागणी केली होती .कारण ही तसेच होते . अहिल्यानगरीच्या सरहद्दीवर वसलेली मेंढपाळाच्या वस्तीवरील लेकरांना उपलब्ध संगणकावर विविध कृती करण्यास शिकविले तेही अगदी पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्वच्या सर्वच लेकरांना .. विशेष आंनद हा होतो की शंभर टक्के सर्व विद्यार्थी शाळेतील संगणक सफाईदारपणे हाताळतात . अगदी एक्सल मध्ये फाईल ही त्यांनी बनवल्या आहेत . असे असताना तालुक्यातील इतर शाळांना इंटरएक्टिव पॅनेल मिळाले होते . इथे प्रतिकूलता असतानाही आमची मुले संगणक सफाईदारपणे हाताळत असताना ती सर्व या अत्याधुनिक पॅनेल पासून वंचित राहिली होती . प्रतिकूलता किती सांगावी ...कौटुंबिक तर सांगणे नकोच ...परंतु शाळेतील भौतिक सुविधांचा वानव खूप ..विजेची तर खूपच अडचण या वर्षभरात या दोन दिवसांत फक्त पूर्ण दिवस वीज  उपलब्ध झाली . त्याच्या आधी तर कधीतरी दोन चार दिवसांतून अर्धा पाऊण तास वीज असायची . तर पंधरा पंधरा दिवस नसायची ... असे असतानाही आमची गुणी विद्यार्थी संगणक हाताळत असायची . काल साडे चार वाजता फोन आला की पॅनेल घेऊन येत आहेत थांबा... माझ्यासह लेकरे तरी कशी हालतील .. एकदाचा जबरदस्त फिचर असलेला पॅनेल पोहोचला त्याबद्दल मा.नामदार सभापती महोदय रामजी शिंदे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानायचे ठरवले . व साहेबांना त्यांच्या नंबरवर टेक्स्ट मेसेज करून आभार मानले .आता पुढील काही दिवसांत इन्स्टॉलेशन होऊन त्याच्या वापराचा मनस्वी आनंद आम्ही सर्व घेऊत ... पुनःश्च एकदा मा.सभापती महोदय ना.रामजी शिंदे साहेब आपले खूप खूप आभार ...