माता पालक गट मेळावा आज दिनांक 10/01/2024 रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी येथे आयोजित करण्यात आला . यावेळी उपस्थित माता पालक व शिक्षिका श्रीम.रंधवे मॅडम यांनी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या , उद्धारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले. याप्रसंगी शिक्षिका श्रीम.रंधवे यांनी माता पालक गटाची भूमिका व कार्य उद्धृत केले व मातांनी मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे समन्वयाने काम करण्याचे आश्वासन दिले. शाळेतील मुलांच्या प्रगतीचा आढावा ही यावेळी उपस्थित माता पालकांना देऊन आवश्यक तेथे आपल्या पाल्यांच्या उणीवा दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. एकंदरीत आजचा माता पालक गटांचा मेळावा उत्साही व आश्वासक ठरला. यावेळी सौ.अरुणा हनुमंत पालवे ,सौ.मनीषा प्रल्हाद देमुंडे ,सौ.प्राची राहुल देमुंडे ,सौ.आशाबाई गंगाराम पालवे ,सौ.ताई धनंजय पालवे , सौ.जयश्री किसन देमुंडे ,सौ.रतन बिभीषण देवकाते ,सौ.शुभांगी विठ्ठल देवकाते , सौ.मीरा जनार्धन पालवे,सौ.सुनीता पंडित देमुंडे,सौ.माई भाऊ देवकाते , श्रीम.कमल देशमुख यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.