*न्यू जर्सी अमेरिका येथील ग्लोबल संघटनेचे अध्यक्ष किशोरदादा गोरे यांनी देमनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला..*
*तसेच आज जिल्ह्यातील 100 शाळांमध्ये ग्लोबलनगरी परिवाराचे सदस्य 100 शाळांशी संवाद साधून जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांशी मुलांना प्रेरणा देऊन त्यांना त्यांचे भविष्य संदर्भात चर्चा करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांनी, पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळे पणाने उत्तरे देऊन परदेशाविषयी असणाऱ्या प्रश्नांची उकल होऊन मुलांमध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा, त्याच्यामध्ये उच्च शिक्षण घेण्याची क्षमता निर्माण व्हावी आणि आपण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी असूनही कमी नाहीत ही भावना निर्माण होण्यास यामुळे नक्कीच मदत होणार आहे.*
*या उपक्रमात शा.व्य.समिती अध्यक्ष, गावचे सरपंच एकनाथ आबा वाघमारे उपसरपंच एकनाथ साळुंके काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दादा साळुंके सृजनच्या संस्थापिका व बारामती अग्रीकल्चरल ट्रस्टच्या चेअरमन सुनंदाताई पवार या उपस्थित होत्या. त्यांनी या संवादात विविध विषयांवर किशोरदादांशी चर्चा केली त्यांनी यावेळी शिक्षण, पर्यावरण , मुलींचे शिक्षण, पर्यावरण ,शेती या विषयावर ग्लोबलनगरीचे अध्यक्ष किशोरदादा गोरे यांनी चर्चा केली मुलांच्या शिक्षणासंदर्भात मध्ये विविध उपक्रमांच्या आणखी काय करता येईल आपल्या समाजासाठी या अनुषंगाने चर्चा केली .विविध प्रश्न मांडले चर्चा केल्या आणि दोन्ही ठिकाणचे भारतातील शिक्षण प्रशिक्षण यातील तफावत आणि त्यावर चर्चा केली किशोरदादा गोरे यांनीही मनमोकळ्या पणे सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली .या थेट संवादाने विद्यार्थ्यांसह सर्वांनाच खूप आनंद झाला.*
*याप्रसंगी जि.प.अळसूंदे शाळेतील वेदिका राजेंद्र साळुंके हीचा इस्रो सहलीसाठी निवड झाल्याबद्दल तिचे व वर्गशिक्षक श्री. रासकर सर व सहशिक्षकांचे कर्जत-जामखेडचे विद्यमान आमदार रोहितदादा पवार याच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांनी अभिनंदन केले.*
*या संवादासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या व या व्हिडीओ कॉन्फरन्सविषयी मार्गदर्शन केले.यावेळी नगरवरून आलेले मराठवाडा साथी यावृत्तपत्राचे संपादक बाजीराव खांदवे , लोकमतचे पत्रकार व पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र अनारसे , पत्रकार सुभाष माळवे यांनीही आवर्जून संवादात सहभाग घेतला.*
*या उपक्रमात कर्जत तालुक्यातील देमनवाडी, अळसूंदे,साळुंकेवस्ती,आणि बागवस्ती या चार जि.प. शाळांतील 15 शिक्षक व 250 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.*
*या उपक्रमाचे नियोजन तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र राऊत यांनी केले तर यासाठी केंद्रप्रमुख व्हटकर मॅडम, मुख्याध्यापिका दैठणकर मॅडम, सहशिक्षिका विजया रंधवे राऊत , सुरेखा कावरे ,रेणुका चव्हाण, शुभांगी पाडळकर,शिवाजी ढोबे , संजय पवार , संतोषकुमार खंडागळे यांचे सहकार्य लाभले. शेवटी संदीप रासकर सर यांनी आभार मानले*
🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment