सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


Saturday, 18 August 2018

2 जुलै रोजी वासुदेव फर्निचर चे संचालक आदरणीय मेघराजजी बजाज यांनी शाळेस 2 कपाट 2 टेबल व 1रॅक भेट देऊन शाळेच्या प्रगतीविषयी व विविध उपक्रमांविषयी कौतुकाचे उदगार काढले त्यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी आदरणीय काटमोरे साहेब व गटशिक्षणाधिकारी आदरणीय अनिल शिंदे साहेब यांनी मुलांची प्रगती पाहून दोन्ही शिक्षकांचे अभिनंदन केले . हे क्षण आमच्या शाळेसाठी व देमनवाडीसाठी अविस्मरणीय ठरले




2 जुलै रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी आदरणीय रमाकांत जी काटमोरे साहेबांनी शाळेस भेट देऊन डिजिटल कक्षाचे उदघाटन करून मुलांनी बनविलेल्या शैक्षणिक पीपीटी पाहून कौतुकाची थाप पाठीवर टाकून आमचा उत्साह द्विगुणीत केला .









ग्रामपंचायत आळसुंदे यांच्या वतीने शाळेत सुमारे 2 लाख रुपयांच्या निधीतून ब्लॉक बसविण्याचे काम चालू आहे . ग्रामपंचायत सदस्य श्री भारत देवकाते व श्री कांतीलाल पालवे यांच्या व सर्व देमनवाडी ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नाचे हे फलित



७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संघटना कर्जत तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप. मा गोकुळ शेठ बरकडे यांच्यावतीने