*आज माझ्या शाळेत vc झाली शांघाय चीन येथून ग्लोबलनगरी चे सन्माननीय सदस्य श्री प्रशांतजी कादरे यांनी विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ ,सरपंच ग्रामपंचायत सदस्य आम्ही दोन्ही शिक्षक आपले आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्री शिंदे साहेब सर्वजण मिळून दीड तास परस्परांशी चर्चा , संवाद करत होतो . दोन्हीकडून उत्स्फूर्तपणे सहभाग होत होता शेवटी प्रशांतजी कादरे यांचा मोबाईल डिस्चार्ज होऊ लागल्याने vc थांबवावी लागली . असेच वर्षभर ग्लोबलनगरी द्वारे mentor म्हणून प्रशांतजी शाळेशी कनेक्ट राहणार आहेत व नोव्हेंबरमध्ये शाळेस भेट देण्यासाठी येणार आहेत . एक अवर्णनीय व अविस्मरणीय असे क्षण ठरले या vc चे दीड तास . विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ व शिक्षक यांच्यात जणू चढाओढ लागली होती संवादात भाग घेण्यासाठी . गटशिक्षणाधिकारी शिंदे साहेबांनी सुद्धा सर्व दीड तास थांबून कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून घेतले त्यांच्या मोबाईल मध्ये व स्वतः साहेबांनी ही प्रशांतजीशी मनमोकळा संवाद साधून vc ची उंची वाढवली . जबरदस्त अशा क्षणांचा मी व मिसेस श्रीम विजया रंधवे राऊत दोघेही साक्षीदार ठरलो हे अवर्णनीय व अविस्मरणीय ठरले .* ~धन्यवाद ग्लोबलनगरी व त्यांची टीम~
Sunday, 9 September 2018
Saturday, 18 August 2018
2 जुलै रोजी वासुदेव फर्निचर चे संचालक आदरणीय मेघराजजी बजाज यांनी शाळेस 2 कपाट 2 टेबल व 1रॅक भेट देऊन शाळेच्या प्रगतीविषयी व विविध उपक्रमांविषयी कौतुकाचे उदगार काढले त्यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी आदरणीय काटमोरे साहेब व गटशिक्षणाधिकारी आदरणीय अनिल शिंदे साहेब यांनी मुलांची प्रगती पाहून दोन्ही शिक्षकांचे अभिनंदन केले . हे क्षण आमच्या शाळेसाठी व देमनवाडीसाठी अविस्मरणीय ठरले
Subscribe to:
Posts (Atom)