सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


Wednesday, 11 November 2015

आदर्श शाळा देमनवाडी : काही राहून गेलेल्या शुभेच्छा

आदर्श शाळा देमनवाडी : काही राहून गेलेल्या शुभेच्छा

काही राहून गेलेल्या शुभेच्छा

काही राहून गेलेल्या दिपावली शुभेच्छा.....

बाहेर दिवाळीची धामधून सुरु असताना वेटिंग रुममध्ये बसुन, ICU मधे अॅडमिट असलेल्या नातेवाईकाच्या टेन्शनमधे जे कोणी बसलेत त्यांनी त्या टेन्शनमधनं लवकर मुक्त होऊन त्यांनाही दिवाळी साजरी करता येऊदे. तुमचा आजारी नातेवाईक लवकरच रोगमुक्त व्हावा आणि घरी सुखरूप परत यावा ही शुभेच्छा....

फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बाळगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करु शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत ही शुभेच्छा...

शेजारणीचा भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करुन आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं ही शुभेच्छा....

काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करुन सुखावणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जीभेला मिळावं ही शुभेच्छा....

बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा ही अनेकांची अनेक वर्षांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण व्हावी ही शुभेच्छा...

गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्यांना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा ही शुभेच्छा....

...या आणि अशा असंख्य मनःपूर्वक शुभेच्छा


एक दिवा सर्व जगाचा पोशिंदा अन्नदाता महापिता बळीराजाचा ✨

एक दिवा महावीर तीर्थंकरांच्या अहिंसेचा ✨

एक दिवा विज्ञानवादी विचार देणार्या तथागत बुद्धाच्या समतेचा आणि प्रभावी प्रचार प्रसाराचा ✨

एक दिवा भागवताची पताका खांद्यावर घेऊन पंजाबच्या गुरुग्रंथ साहिब मधे स्थानस्त झालेल्या संत नामदेवाच्या बलिदानाचा ✨

एक दिवा विद्रोही संत तुकाराम यांच्या विज्ञानवादी महान कार्य  आणि त्यागाचा ✨

एक दिवा शहाजीराजे यांच्या स्वराज्य संकल्पनेचा ✨

एक दिवा जीजाऊ मासाहेबांच्या संस्कार आणि निर्धाराचा ✨

एक दिवा स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वितेचा ✨

एक दिवा स्वराज्य रक्षक महाबलिदानी छञपती संभाजीराजे यांच्या असामान्य पराक्रम आणि विद्वता आणि आतुलनिय धैर्याचा ✨

एक दिवा प्रजावत्सल राज्यकार्ति राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या दूरदृष्टि समतेच्या सुशासनाचा ✨

एक दिवा स्वराज्याचे आद्य क्रांतिसुर्य महाराजा यशवंतराव होळकरांच्या पराक्रमाचा ✨

एक दिवा आरक्षणाचे जनक पुरोगामी राजा राजर्षी शाहू महाराजांचा ✨

एक दिवा ज्ञानाची कवाडे ऊघडणा-या क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा ✨

एक दिवा ज्ञानदानाची माई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कष्टाचा आणि त्यागाचा ✨

एक दिवा क्रांतिज्योति सह मुस्लिमांमधे शिक्षण नेलेल्या फातिमा शेख यांच्या अतुलनीय योगदानाचा ✨

एक दिवा माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देणारा महामानव डॉ भिमराव आंबेडकरांचा ✨

एक दिवा शोषितांसाठी कामगारांसाठी आयुष्य वेचलेल्या साहित्य रत्न अण्णा भाऊ साठेंचा ✨

एक दिवा अठरा पगड जातीतील बहुजन आणि मावळ्यांच्या शौर्य आणि बलिदानाचा ✨

एक दिवा गाडगे महाराज तुकडोजी गोरा कुंभार सावता माळी जनाबाई सखुबाई या सम सर्व संत मांदीयाळीतील प्रत्येक पुष्पाचा ✨

एक दिवा करकरे, पानसरे, दाभोळकर कल्बुरगी यांच्या बलिदानाचा ✨

एक दिवा आजवर साढ़ेचार लाख आत्महत्या केलेल्या जगाचा पोशिंदा झालेल्या बळीराज्याच्या
वारसांचा ✨

एक दिवा आपल्या संविधानातील मूल्ये - समतेचा, सहिष्णुतेचा ,विश्वधर्मी विचारांचा ✨



🙏🏼  राऊत परिवार कर्जत अ नगर 🙏🏼

Monday, 9 November 2015

दीपावली शुभेच्छा

इडा पिडा टाळुया, बळीचे राज्य आणुया! सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा! दिवाळी हा उजेडाचा, आनंदाचा क्षण! आणि तो बळीराजाची आठवण काढण्याचाही दिवस! बळीराजा; कृषी संस्कृतीचा नायक, प्रजेची काळजी घेणारा, न्यायी, प्रजेला समभागी पध्दतीने उत्पन्न वाटुन देणारा समतावादी राजा.यज्ञयागावर आधारलेले कर्मकांड आणि शोषणव्यवस्थेस त्याने नकार दिला.... म्हणुन विषमतेचा पुरस्कर्ता असलेल्या, वैदिकांचा प्रतिनिधी वामनाने त्याला युध्दात लबाडीने आणि कपटाने दक्षिणेकडे पिटाळले......... "बटु वामनाने तीन पावलांचे दान बळीराजाकडे मागुन त्याला पाताळी धाडले" या पौराणिक कथेचा हा खरा अर्थ. पुढचा सगळा इतिहास जेत्यांनी म्हणजेच वैदिकांनी लिहीलेला असल्याने व मध्ययुगात आम्हाला शिक्षणापासुन वंचित ठेवल्याने तसेच पुरोहितांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या निरर्थक कर्मकांडात आम्ही मानसिक गुलाम बनल्याने आम्ही आमच्याच नायकांना विसरलो..... चला उजेडाचे स्वागत करुया! बुध्द ते तुकाराम; विवेकाची एक सकस, निर्मीतीप्रधान आणि समृध्द परंपरा समजुन घेऊया. दिवाळी साजरी करुया! ....wish you all Happy Diwali