_*क्रांतिसुर्य महात्म्यांचे महात्मा असणारे जोतिराव उर्फ तात्यासाहेब फुलेंच्या जयंतीला अनुरूप असे कार्य आळसुंदे ग्रामीचे लोकनियुक्त सरपंच मा.जिजाबापू अनारसे, उपसरपंच मा.डॉ.अनिल गाडे , माजी उपसरपंच मा.शिवाजीराजे देशमुख , सदस्य ,भा .ज.प.च्या भ.वि. आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.गणेश पालवे, तालुका उपाध्यक्ष मा.रमेशदादा अनारसे ,मा.उपाध्यक्ष मा.काकासाहेब अनारसे , विधान परिषदेचे सभापती मा.रामजी शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक मा.संभाजीराजे गोसावी ,भा.ज.प.चे युवा नेते अतुलराव अनारसे , कर्जतवरून आलेले युवानेते यशराज बोरा व मान्यवरांनी देमनवाडी शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून क्रांतीबांना अभिवादन केले. अशाच प्रकारे महापुरुषांच्या जयंत्या व स्मृतिदिन साजरे होणे अपेक्षित आहे . महापुरुषांना डोक्यावर घेण्यापेक्षा व त्यांच्या केवळ तसबीरी पूजण्यापेक्षा सध्याच्या परिस्थितीत त्यांना डोक्यात घेण्याची जास्त गरज आहे. त्यादृष्टीने समस्त आळसुंदेकर वाटचाल करीत आहेत सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏 क्रांतिबांना मानाचा मुजरा 🙏 यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र राऊत यांनी क्रांतिसुर्य महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. शाळेतील सहकारी शिक्षिका श्रीम. विजया रंधवे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. *_
No comments:
Post a Comment