सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


Sunday 4 September 2022

#मिशन_आपुलकी 2022

 'देमनवाडी शाळेत सोनियाचा दिनु आज उगवला'

आज दिनांक 03/09/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी येथे शाळा व्यवस्थापन समितीची रचना करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शंभर टक्के पालक यामध्ये महिलांचाही समावेश होता. यावेळी मुख्याध्यापक रविंद्र राऊत यांनी समितीच्या रचनेची माहिती पालक व ग्रामस्थांना दिली व शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना करण्याचे आवाहन केले.यावेळी सर्व ग्रामस्थ व पालकांनी एकमुखाने शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हनुमंत पालवे व उपाध्यक्षपदी प्रल्हाद देमुंडे यांची निवड केली.आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून झालेल्या सभेत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग जमा करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य भारतआबा देवकाते यांनी वडील स्व.उत्तम देवकाते यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी वायरलेस साऊंड ट्रॉली देण्याचे कबूल केले , तसेच पंचायत समितीचे ब्लॉक मॅनेजर राहुल देमुंडे यांनी एक संगणक देण्याचे जाहीर केले , आळसुंदे सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन बापू देमुंडे यांनी कैलासवासी भागीरथीबाई देमुंडे यांच्या स्मरणार्थ प्रिंटर देण्याचे कबूल केले , आळसुंदे शाळेचे उपाध्यक्ष सोमनाथ पालवे यांनी देमनवाडी शाळेसाठी दोन मोठे व्हाईटबोर्ड देण्याचे कबूल केले , देमनवाडीतील पहिले अधिकारी कृषी अधिकारी प्रमोद देवकाते यांनी शाळेच्या दोन्ही खोल्यातील अंतर्गत भागांमध्ये शैक्षणिक रंगकाम करून देण्याची जबाबदारी उचलली, तसेच ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल पालवे यांनी शाळेसाठी इन्व्हर्टर देण्याचे कबूल केले , गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर गणेश पालवे यांनी शाळेतील मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचे R.O. फिल्टर देण्याचे कबूल केले, सतीश पालवे यांच्या कडून 10 खुर्च्या देण्याचे कबुल केले,आळसुंदे सेवा सोसायटीचे माजी संचालक प्रकाश पालवे व  देमनवाडी शाळेचे नवनियुक्त उपाध्यक्ष प्रल्हाद देमुंडे यांनी  शाळेसाठी एक अँड्रॉइड एलईडी टीव्ही देण्याचे कबूल केले .तसेच महादेव पालवे यांनी ध्वजस्तंभ उभारून देण्याची जबाबदारी स्विकारली.तसेच सतीश पालवे यांनी 10 खुर्च्या शाळेसाठी देण्याचे कबूल केले. कार्यक्रम वेळी आवश्यक मंडप व साउंड सिस्टीम सौजन्य कांदा व्यापारी बापू पालवे यांनी ही जबाबदारी स्वीकारली .तसेच या होणाऱ्या मोठ्या उत्सवपूर्ण कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ व विद्यार्थी यासर्वांना सुग्रास असे स्नेहभोजन देवकाते परिवाराने देण्याचे जाहीर केले यामध्ये अजिनाथ देवकाते , माऊली देवकाते , शिवाजीराजे देवकाते व देवकाते परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वितेसाठी सहकारी शिक्षिका श्रीमती विजया रंधवे यांनी परिश्रम घेतले. प्रा.आप्पासाहेब पालवे यांनी उपस्थितांचे आभार मानून शाळेच्या प्रगतीविषयी व दोन्ही शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी पत्रकार विष्णू देमुंडे , भाऊसाहेब देमुंडे ,बापू पालवे , धनंजय पालवे ,गोरख देवकाते ,गंगाराम पालवे ,माऊली देवकाते , अजिनाथ देवकाते , गणेश देमुंडे,यशवंत पालवे, बिभीषण देवकाते,किसन देवकाते , तानाजी देमुंडे, सौ ताई देवकाते , सौ अर्चना पालवे,सौ.प्रतिभा शेजाळ यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालक ,ग्रामस्थ उपस्थित होते.वरील सर्व बाबींची खरेदी 25 सप्टेंबर रोजी एकत्रित करून 2 ऑक्टोबर नंतर मान्यवर अधिकाऱ्यांची वेळ घेऊन मोठया उत्साहात साहित्य शालार्पण कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले.