सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


Monday 9 November 2015

दीपावली शुभेच्छा

इडा पिडा टाळुया, बळीचे राज्य आणुया! सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा! दिवाळी हा उजेडाचा, आनंदाचा क्षण! आणि तो बळीराजाची आठवण काढण्याचाही दिवस! बळीराजा; कृषी संस्कृतीचा नायक, प्रजेची काळजी घेणारा, न्यायी, प्रजेला समभागी पध्दतीने उत्पन्न वाटुन देणारा समतावादी राजा.यज्ञयागावर आधारलेले कर्मकांड आणि शोषणव्यवस्थेस त्याने नकार दिला.... म्हणुन विषमतेचा पुरस्कर्ता असलेल्या, वैदिकांचा प्रतिनिधी वामनाने त्याला युध्दात लबाडीने आणि कपटाने दक्षिणेकडे पिटाळले......... "बटु वामनाने तीन पावलांचे दान बळीराजाकडे मागुन त्याला पाताळी धाडले" या पौराणिक कथेचा हा खरा अर्थ. पुढचा सगळा इतिहास जेत्यांनी म्हणजेच वैदिकांनी लिहीलेला असल्याने व मध्ययुगात आम्हाला शिक्षणापासुन वंचित ठेवल्याने तसेच पुरोहितांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या निरर्थक कर्मकांडात आम्ही मानसिक गुलाम बनल्याने आम्ही आमच्याच नायकांना विसरलो..... चला उजेडाचे स्वागत करुया! बुध्द ते तुकाराम; विवेकाची एक सकस, निर्मीतीप्रधान आणि समृध्द परंपरा समजुन घेऊया. दिवाळी साजरी करुया! ....wish you all Happy Diwali

No comments:

Post a Comment